N

नाते

नाते माझे हे तुझ्याशी,
जसे पावसाचे धरणीशी.
वाट पाहे चकोर जशी चंद्राची,
तशी आस तुझ्या येण्याची ‌.
जशी सागरा
आपुलकीने भेटे नदी,
तशी आपलीही
भेट व्हावी कधी.
नाते माझे हे तुझ्याशी,
जसे आत्म्याचे देहाशी.
जरी नसले ते रक्ताचे
तरी विश्वास असे व आपुलकीचे.
पृथ्वीला प्रकाशमय करण्यासाठी
जसा असे कायम रवी,
तशीच मला आयुष्यातील प्रत्येक क्षणी
फक्त तुझीच साथ हवी.
©navi07