S

पाहता मन ही झुरे

ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे,
हरवुनी या जगी, स्वप्नात तुझ्या रमून जावे,
पाहता तुला वाटते मला,
बाहुतं तुझ्या गुंतून जावे,
ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे ।।धृ।।
ओठ तुझे जणू, नाजूक कळी ती भासे,
नाकाची नथ तुझी, जणू तिचीच शोभा वाढे,
पाहता तुला वाटते मला,
बाहुतं तुझ्या गुंतून जावे,
ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे ।।१।।
नक्षीदार नयनी तुझ्या, प्रीतीची चाहूल दिसे,
हळुवार उघड झाप ती, जणू पाहतच बसावे,
पाहता तुला वाटते मला,
बाहुतं तुझ्या गुंतून जावे,
ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे ।।२।।
रेशमी केसात माळून गजरा, नाजूक मानेवर शोभे,
गंध मोगऱ्याचा त्या, मोहून तया त जावे,
पाहता तुला वाटते मला,
बाहुतं तुझ्या गुंतून जावे,
ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे ।।३।।
जवळ येना जरा अशी तू, क्षण हे मिठीत सामावून घ्यावे,
स्पर्श तुझ्या त्या मिठीचा, हृदयात साठवून घ्यावे,
पाहता तुला वाटते मला,
बाहुतं तुझ्या गुंतून जावे,
ओठ गुलाबी तुझे, पाहता मन ही झुरे ।।४।।
शेखर पंडित
©shekharp.p