D

तो दिवस .....

एक वेगळाच दिवस
आणि वेगळच , परकं वाटणार जग .
कधीतरी अनुभवायला आलेला तो दिवस ,
जेव्हा स्वतः च घरही दुरावताना दिसत !
म्हणायला झालं तर एक नवा संसारच ,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वितळणारं मन ,
आणि डोळ्यात जमलेल्या आसवांची गर्दी ती वेगळीच !
तो दिवस माझ्या ही वाट्याला आला .
मी स्वतः ला सावरत होते ,
पण कुणाच्या तरी मनाचा , डोळ्यातील आसवांचा मात्र बांध सुटला होता.
निसर्गानेही त्यादिवशी परवानगी दिली नव्हती ,
कुणाचा तरी तो काचेतून अस्पष्ट दिसणारा काळजीचा , विसाव्याचा हात पाहण्याची .
परतीचा निरोप घेत ,
एकटी वाटेवर निघालेली मी......
तो केसांमधून वाहणारा वारा वास्तव्याची जाणीव करून देत होता ,
आणि चेष्टा करीत विचारत होता , "कसं सोडवशील स्वतः ला?"
परंतु वरतुन पडणार्या पावसाच्या थेंबानी मात्र साथ दिली ,
त्यांनी माझी आसवं लपवली .....
त्यादिवशी जणू निसर्गही जाणीव करून देत होता ,
येणार्या भविष्याची ;
जे कधीतरी माझं भावविश्व होतं ....
©ddhage