B

!!!तुझ्या गालावरची खळी माझ्या नजरेला भाळली !!!

!!!तुझ्या गालावरची खळी माझ्या नजरेला भाळली !!!
माझ्या मनाला नेहमी उभारी देणारी आणि प्रेरित करणारी जणू ती तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी स्मित हास्याची नाजूक गालावरची खळी !
रात्रीच्या लख्ख लखत्या चांदण्याला लाजवणारी आणि माझ्या नजरेला भाळणारी ती तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी स्मित हास्याची नाजूक गालावरची खळी !
माझ्या हृदयात चमकणारी आणि ह्र्दयाच्या गाभाऱ्यात प्रेमाचे गंद जपून ठेवणारी ती तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी स्मित हास्याची नाजूक गालावरची खळी !
माझ्या सुखावलेल्या चेहऱ्याला नेहमी प्रसन्न आणि रोमहर्ष करणारी ती तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी स्मित हास्याची नाजूक गालावरची खळी !
मला नेहमी साद घालणारी आणि नवी दिशा दाखणारी ती तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी स्मित हास्याची नाजूक गालावरची खळी !
रवींद्र भोये
©bhoyeravi