।।उणिव गोंदावल्याची।।
प्रभात समयी नित्य स्मरे मज सोबत काकडआरतीची,
मधुर वाणी भूपाळी ही प्रसाद साखर लोण्याची,
तल्लभ होते आज मज आपल्या दर्शनाची,
कशी भरावी महाराज ही उणिव गोंदावल्याची,
खंत ही वाटे खेद ही वाटे वेळही मन भरून येण्याची,
दर्शनाने जाती तिमिर अन् वाढ हि आत्मविश्वासाची,
साद ही पुरी करावी आम्हा लेकरांची,
कशी भरावी महाराज ही उणिव गोंदावल्याची,
राम नामाचा प्रसाद मिळता मन तृप्त होई,
तुमच्या चाहुलखूणा सांगती गोठ्यातील गाई,
अस्तासमीप गहिवरून येई सोडता साथ गोंदावल्याची,
।।।।कशी भरावी महाराज ही उणिव गोंदावल्याची।।।।
©chaitanyak
C